• Permalink Gallery

    भारतातील विवाह नोंदणी कायदा (Marriage Registration in India)

भारतातील विवाह नोंदणी कायदा (Marriage Registration in India)

By |December 4th, 2019|

Smt. Seema v. Ashwani Kumar (2006 (2) SCC 578) केस मध्ये दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने भारतातील सर्व विवाहांची नोंद करणे कायद्याने बंधनकारक केलेले आहे. बर फक्त या निकालापुरते न बोलता आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार केला तर विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची गरज अनेक महत्वाच्या कामासाठी पुरावा म्हणून लागते आणि जर त्यावेळी नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर नेमक्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे विवाह नोंदणी ची नेमकी प्रक्रिया काय आहे हे जाणून घेणे हर एक व्यक्तीची जबाबदारी ठरते. सर्वसामान्यपणे आपल्या भारतात विवाह नोंदणी ही दोन कायद्यांतर्गत होवू शकते.
  • Permalink Gallery

    मृत्युपत्र : एक अत्यावश्यक निर्णय

मृत्युपत्र : एक अत्यावश्यक निर्णय

By |September 24th, 2019|

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की सुंदर आयुष्य जगल्यानंतर मृत्यूपश्चात देखील आयुष्यभर  कमावलेली भौतिक, भावनिक आणि अध्यात्मिक कीर्ती कायम राहावी. मानसिक समाधान अथवा ज्याला पुण्यकर्म परोपकार म्हणतात तो नि:संदिग्धपणे व्यक्तीनिष्ठ ठरतो. राहता राहिला प्रश्न व्यक्तीने कमावलेल्या भौतिक इस्टेटीचा तर मात्र मरणानंतर ही इस्टेटीचा वाद हा १०० पिढ्यांपर्यंत चालू राहू शकतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या स्वअर्जित संपत्ती बाबतचा भीषण वाद टाळण्यासाठी ती हयात असतानाच योग्य प्रकारे इच्छा’पत्राच्या आधारे विल्हेवाट लावणे हे सर्व दृष्टीने न्याय ठरते.
व्यक्तीने इच्छापत्र अथवा मृत्युपत्र ज्याला सर्वसाधारणपणे “Will” म्हणून ओळखले जाते ते जर स्वतःच्या हयाती मध्ये बनवून ठेवले नाहे तर मृत्यूपश्चात व्यक्तीची संपत्ती ही तिच्या वाली वारसांमध्ये “हिंदू वारसाहक्क कायदा १९५६” च्या तरतुदीनुसार वाटप केली जाते. मात्र जर व्यक्तीने तिच्या हयातीमध्ये इच्छापत्र करून ठेवले असल्यास मृत्यपश्चात संपतीचे वाटप हे “Indian Succession Act 1925” म्हणजेच “भारतीय वारसअनुक्रम कायदा १९२५” च्या अखत्यारीत येते. इच्छापत्राच्या आधारे व्यक्ती तिच्या इच्छेनुसार तिच्या संपत्तीचे वाटप करू शकते. 
    “Indian Succession Act [...]