भारतातील विवाह नोंदणी कायदा (Marriage Registration in India)

By |December 4th, 2019|

Smt. Seema v. Ashwani Kumar (2006 (2) SCC 578) केस मध्ये दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने भारतातील सर्व विवाहांची नोंद करणे कायद्याने बंधनकारक केलेले आहे. बर फक्त या निकालापुरते न बोलता आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार केला तर विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची गरज अनेक महत्वाच्या कामासाठी पुरावा म्हणून लागते आणि जर त्यावेळी नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर नेमक्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे विवाह नोंदणी ची नेमकी प्रक्रिया काय आहे हे जाणून घेणे हर एक व्यक्तीची जबाबदारी ठरते. सर्वसामान्यपणे आपल्या भारतात विवाह नोंदणी ही दोन कायद्यांतर्गत होवू शकते.