का टाकले आहेत PMC बँकेवर निर्बंध ?

By |September 25th, 2019|

सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरस्वत बँकेच्या शतक महोत्सवी पदार्पण सोहळ्यात २०१७ साली नितीन गडकरी यांनी रिझर्व्ह बँकेला कानपिचक्या देताना म्हटले होते
“  देशातील सहकारी बँका जनसामान्यांच्या कष्टावर उभा राहिलेल्या आहेत पण या बँकाकडे रिझर्व्ह बँक नेहमीच संशयाच्या नजरेने पाहते. त्यांची खाजगी बँकांशी तुलना करून त्यांच्यावर नेहमी कडक निर्बंध लावले जातात पण खासगी बँका या केवळ आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असतात तर सहकारी बँका मात्र जनसामान्यांच्या उन्नती साठी धडपडत असतात त्यामुळे रिझर्व्ह बँकेने अशा बँकांकडे संशयाने बघू नये”

मा. नितीन गडकरी १५ सप्टेंबर २०१७ रोजी सारस्वत बँकेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात बोलताना.

पण रिझर्व्ह बँकेचा सहकाराकडे बघण्याचा दृष्टीकोन आजही तोच आणि तसाच आहे. राज्यातल्या पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक या एका आघाडीच्या सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातले आहेत. सदर निर्बंध हे पुढच्या ६ महिन्यासाठी बंधनकारक असून ६ महिन्यानंतर पुन्हा एकदा बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेवून पुढील निर्णय घेण्यात येतील. ग्राहकांना ६ महिन्याच्या कालावधीत बँकेतून फक्त १००० रुपये [...]